सकल हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे सांगोल्यात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

सांगोला (प्रतिनिधी):-श्रद्धा वालकर या हिंदू युवतीचे 35 तुकडे करून निर्घृण हत्या करणार्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर लव्ह जिहाद विरोधी कायदा व धर्मांतर विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाज सांगोला तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक 15 डिसेंबर या दिवशी भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्च्याच्या प्रारंभी महात्मा फुले चौकात माजी सैनिक रावसाहेब साळुंखे यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. यानंतर शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोर्चाचा समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात आला. याठिकाणी संतोष भोसले आणि सुनीता दीक्षित यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी घोषणा देण्यात आल्या.
या वेळी इंजि.संतोष भोसले, डॉ. मानस कमलापूरकर, अनिल वाघमोडे, प्रवीण जानकर, ओंकार कुलकर्णी, मयुरेश गुरव, अतुल चव्हाण, सागर मोहिते, नवनाथ कावळे, संतोष पाटणे, पत्रकार नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, डॉ. गणपतराव मिसाळ, नारायण मिसाळ, डॉ. अनिल कांबळे, अरविंद केदार, वैभव देशमुख, प्रतीक पवार, ओम स्वामी, संजय गव्हाणे, महेश चौधरी, संतोष सोनंदकर, महेश गवळी, मधुकर पवार, अच्युत फुले, घेवाराम, गणपत पटेल यांसह शेकडो धर्मप्रेमी व महिला उपस्थित होत्या. डॉ. मानस कमलापूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.