नंदेश्वर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

नंदेश्वर (प्रतिनिधी)-नंदेश्वर ता-मंगळवेढा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवसागर साधक ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे,भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,माजी सरपंच भारत गरंडे,ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,राहुल कसबे,आप्पासाहेब रामगडे,दादासाहेब मासाळ, बाळासाहेब मोटे,पोलिस-पाटील संजय गरंडे,सुभाष खांडेकर, सुरेश लाड,तुकाराम वाघमारे यांच्यासह समस्त ग्रामस्थ व माऊली भक्त उपस्थित होते.