खा.रणजितसिंह.ना. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून माढा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामाकरीता ७८.०० करोड मंजूरी

फलटण प्रतिनिधी – माढा मतदार संघातील खासदार मा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून केंद्राच्या सन २०२२-२३ सी.आर.आय.एफ निधीतून रस्ते व पुलांच्या कामाकरीता रक्कम रु. ७८.०० करोड मंजूर करण्यात आली आहे.यामध्ये ककुरवली-मांडवखडक-दालवडी-उपळवे-कुळकजाई रस्त्याचे बांधकाम फलटण तालुक्याला जोडणारा (MDR-67) किमी0/00 ते 26/400 जिल्हा- सातारा 25.00 कोटी, इंदापूर अकलूज सांगोला जत मेंढगिरी उमराणी ते राज्य सीमा रस्ता SH-125 किमी 27/00 ते किमी 32/400 आणि अकलूज बायपास किमी 0/00 ते किमी 3/00 ता माळशिरस, जिल्हा-सोलापूर ( भाग अकलूज ते वेळापूर)
17.00 कोटी,ODR-95 ललगून नेर रस्त्यावरील प्रमुख पुलाचे बांधकाम ता. खटाव, जि. सातारा.8.00 कोटी, वाणीचिंचोळे भोसे रेड्डे निंबोणी येड्राव मारवडे रोड MDR-69 किमी 33/00 ते 40/600 पर्यंत सुधारणा सांगोला, जि. सोलापूर.9.00 कोटी MDR 117 ते तरंगफळ – झांजेवाडी खुडूस- विझोरी – चाँडेशवाडी- अकलूज सावतगव्हाण तांबवे गणेशगाव ते SH-145 रस्ता MDR-175 – किमी 23/00 ते 23/800 किमी 27/700 ते 28/500 आणि 32/800 ते 34/00 पर्यंत सुधारणा (भाग सवतगव्हाण व तांबवे) ता. माळशिरस जि. सोलापूर 4.00 कोटी,वेळापूर तांदुळवाडी ते माहीम MDR-208 किमी 00/00 ते 8/00 रस्ता सुधारणा ता. माळशिरस जि. सोलापूर 5 कोटी,
माणगंगा नदीवर लघु पुलाचे बांधकाम MDR-10 ते टाकेवाडी पांगरी वावरहिरे राणंद पळशी पिंपरी ते S.H. – 141 रोड MDR- 47 किमी. 34/800 ता. माण, जिल्हा सातारा 8 कोटी,दहिवडी गोंदवले बुद्रुक नरवणे वडजल वली विरळी झरे रोड MDR 50 कि.मी. 13/100 नरवणे गावाजवळ ता. माण, जि. सातारा 2 कोटी,
एकूण रक्कम
78.00 कोटी ची मंजूरी मिळाली आहे.बराच वर्षापासून मतदार संघातील ग्रामीण भागातील व तालुक्यातील आणि जिल्हापर्यंत जोडण्यात येणाऱ्या प्रमुख रस्ते खिळखिळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता यावर तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत होती परंतु पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी होत होती. याबाबत खासदार रणजितसिंह.ना.निंबाकर यांच्याकडे तक्रारी  आल्यानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या आणि याबाबत केंद्राच्या 2022- 23 सी.आर.आय.एफ निधीतून माढा मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या कामासाठी 78 करोड रुपये मंजुरी आणली मतदारसंघातील विकास कामे मंजूर करण्या साठी खासदार निंबाळकर यांचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मतदारसंघातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button