सांगोला तालुकाशैक्षणिक

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सांगोला विद्यामंदिरचे दैदिप्यमान यश

19 वर्ष वयोगट मुले,मुली दोन्ही संघानी फटकाविले जिल्हा अजिंक्यपद
सांगोला (प्रतिनिधी) अकलूज तालुका माळशिरस येथे झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील १९ वर्ष वयोगट मुले व मुली दोन्ही गटातील संघानी उत्तुंग कामगिरी करत अजिंक्यपद पटकाविले.
या यशस्वी खेळाडूंना सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव व अजित मोरे यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण , संतोष लवटे,सुभाष निंबाळकर याचे मार्गदर्शन मिळाले.

या धवल यशाबद्दल या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांचे हस्ते व प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले , पोपट केदार , मार्गदर्शक क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव व अजित मोरे, ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक संतोष लवटे,सुभाष निंबाळकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या..
तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक बिभिषण माने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!