सांगोला तालुका

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाल बाजार

भाजी घ्या भाजी… बोर घ्या गोड बोरे… पपई घ्या, पेरू घ्या, चिकू घ्या, गाजर घ्या, वांगी घ्या, चिवडा घ्या असा चिमुकल्यांच्या आवाजाने बाजारात आनंद भरला होता. आलेगाव(ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी विद्यार्थ्याचा बालबाजार भरला होता. फळे भाजीपाल्यासह विविध दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी खरेदीचा आनंद लुटला. या बालबाजारामध्ये कांदे, बटाटे, भाजीपाला, फळे, स्टेशनरी अशा साहित्याची दुकाने मांडली होती. आठवडा बाजाराचे स्वरूप या बाजाराला आले होते. खरेदीसाठी पालकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान मिळावे, खरेदी विक्री करणे व पैशाचा हिशोब करणे याचा अनुभव यावा म्हणून बालबाजार आयोजित केल्याचे मुख्याध्यापक विलास नवघरे यांनी सांगितले याप्रसंगी शिक्षिका श्रीमती देशपांडे मॅडम, झाडबुके मॅडम व सुरवसे सर तसेच सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सर्व पालक व आलेगाव ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!