विज्ञान महाविद्यालयाचे ४ बॉक्सिंग खेळाडू विद्यापीठ संघात

सांगोला (प्रतिनिधी ):- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर बॉक्सिंग पुरुष व महिला संघात सांगोला येथील विज्ञान महाविद्यालयाच्या श्री.रेवण शिंदे , श्री.लक्ष्मण  वाघमोडे , कुमारी स्नेहल देवकते , कुमारी अनुराधा शेळके या चार खेळाडूची निवड  झालेली आहे
सदर स्पर्धा ह्या हरियाणा मधील रोहतक येथे होणार असून त्याकरिता महिलांचा बॉक्सिंग संघ रवाना झालेला आहे
वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शरारिक शिक्षण संचालक प्रा.विजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रभारी प्राचार्य डॉ.आर ए.फुले सर यांचे सहकार्य लाभले असून या खेळाडूंचा सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button