जवळे येथे श्री.यल्लमा देवीची यात्रा उत्साहात संपन्न.

जवळे (प्रशांत चव्हाण):- सांगोला तालुक्यातील जवळे येथील सोनंद रोडवरील कोरडा नदीच्या काठावर असलेल्या श्री.यल्लमा देवीच्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाले.
सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी जवळे गावातून श्री यल्लमा देवीच्या पालखीची पारंपारिक वाद्यासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी देवीची भेदिक गाणी, धनगरी ओव्या हे कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी 8 वाजले पासून ते सायंकाळपर्यंत देवीला भाविक भक्तांकडून नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई , खेळणी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्री.यल्लमा देवीची पालखी जवळे गावातून वाजत, गाजत मानाचे माहेर घेऊन निघाली.त्यानंतर यात्रेची सांगता झाली. या यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवळे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.