अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन संस्थेचे विभागीय अध्यक्ष पद सांगोल्याला मिळावे-डाॅ. प्रभाकर माळी

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचा समाज मेळावा संपन्न
अरण( प्रमोद बनसोडे): शिक्षणासाठी माळी समाजातील विद्यार्थ्यांना परतफेडीची कर्जाऊ शिष्यवृत्ती देणारी व समाज प्रबोधन करणारी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था हि एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना शिष्यवृत्ती स्वरूपात शिक्षणासाठी पैस उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील गरजु व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणारी हि एकमेव संस्था आहे. या संस्थचे जाते संपुर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था या संस्थेचे विभागीय अध्यक्ष हा सांगोला (जि. सोलापूर) येथील व्हावा अशी मागणी माळी महासंघाचे ट्रस्टी डाॅ. प्रभाकर माळी यांनी अरण येथील बैठकीत बोलताना व्यक्त केली.
पुढे बोलताना डाॅ. प्रभाकर माळी म्हणाले, सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून माळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी काम करत असलेल्या या संस्थेला सांगोल्यातुन भरीव देणगी स्वरूपात निधी देता येईल. सांगोल्यात माळी समाजातील अनेक व्यक्ती ह्या उद्योजक व व्यापार तसेच नोकरी क्षेत्रात असल्याने १० व्यक्तीकडून ठराविक निधी या संस्थेला उपलब्ध होईल. यासाठी या संस्थेचे विभागीय अध्यक्ष पद हे सांगोल्याला देणे आवश्यक असल्याचे डाॅ. प्रभाकर माळी यांनी यादरम्यान म्हटले आहे.
अरण (ता. माढा) येथे रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारी सभा व समाज बांधव मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची सुरवात मान्यवरांच्या हस्ते श्री संत सावता महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या मेळाव्यात संस्थेच्या वार्षिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा व ठरवा संमत करण्यात आले. भविष्यातील संस्थेची वाटचाल, संघटन व प्रबोधन याविषयावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचा संस्थेच्यावतीने शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमास पद्माकांत कुदळे, चेअरमन डाॅ. प्रभाकर माळी, उद्योजक गोविंद माळी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत, गणेश माळी, तज्ञ विश्वस्त डाॅ. दत्तात्रय बाळसराफ, डाॅ. स्नेहल बाळसराफ, मधुकर माळी, दत्तात्रय घाडगे, मॅनेजिंग डायरेक्टर रंजभाऊ गिरमे, अध्यक्ष दिलीप राऊत, विजय लोणकर, अँड. गोविंद बादाडे, धिरज कुदळे, डाॅ. निशिगंधा माळी- कोल्हे आदींसह अनेक संस्थेचे पदाधिकारी व माळी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत एकतपुरे यांनी केले.