डॉक्टर रणजीत केळकर आयडॉल ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ने सन्मानित

सांगोल्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ ,लॅप्रोस्कोपी सर्जन आणि श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सांगोला चे संस्थापक डॉ. रणजीत सतीश केळकर यांना २०२२ सालचा लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आयडॉल ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात ला. डॉ. नवल मालू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
1956 पासून अविरतपणे रुग्णसेवे मध्ये अग्रणी असलेल्या डॉक्टर केळकर हॉस्पिटल चे संस्थापक कै. डॉ व्यंकटेश शिवराम केळकर यांची तिसरी पिढी आज रुग्णसेवेचा वारसा जपते आहे. ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल स्त्रियांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया, अत्यल्प दरामध्ये वंध्यत्व बाधित जोडप्यांसाठी टेस्ट ट्यूब बेबी चा उपचार,सुसंकृत-सुजाण पिढीसाठी गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार ही डॉक्टर केळकर हॉस्पिटलची त्रिसूत्री आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. रणजीत केळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.