“अस्तित्व”संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील 61 मुलींना सायकली वाटप करणार – शहाजी गडहिरे

येत्या ५ जानेवारी रोजी बंधन पॅलेस येथे सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन
अटलास कॉपको इंडिया लिमिटेड व सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया यांच्यासहकार्याने व”अस्तित्व”संस्थेच्या वतीने ग्रामीण भागांतील विशेषतः वाड्यावस्त्यावर रहाणाऱ्या एकुण ६१ मुलींना गुरुवार दिनांक ५ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून गरीब कुटुंबातील मुलींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की अस्तित्व संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण विकासाचे काम करीत आहे.आताच्या काळात गावातून उठून वाड्या-वस्त्यांवर स्वतःच्या शेतांवर रहायला जाणारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.वाड्यावस्त्यांवर रहायला गेले की, मुलींना शाळेत जाणे येणे अडचणीचे ठरते पालकांची मुलींना सायकल घेउन देण्याची आर्थिक परिस्थिती नसते.त्यामुळे अनेक पालक मुलींना सातवी नंतर चे शिक्षण देत नाहीत पूढे जाऊन मुलींचे अल्पवयात लग्नं लाऊन देतात या पार्श्वभूमीवर अटलास कॉपको व सी एफ टी आय या संस्थांच्या सहकार्याने सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी, मानेगाव, निजामपुर, वाकी (घेरडी), वाणी चींचाळे व मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील ६१ मुलींना चांगल्या दर्जाच्या सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे यावेळी अटलास कॉपको इंडिया लिमिटेड चे मनुष्य बळ प्रमुख मा.कबीर गायकवाड, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबीलीटी चे मॅनेजर मा.अभिजित पाटील, सेंटर फॉर ट्रान्स्फरमिंग इंडिया चे अमित देशपांडे तसेच अस्तित्व चे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित रहाणार असल्याची माहिती हि शहाजी गडहिरे यांनी दिली आहे.या कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यानी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अस्तित्व संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.