सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये मोबाईल ॲडिक्शन याविषयी सेमिनार संपन्न.

सांगोला इनरव्हिल क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने इ. 7वी ते 9च्या विद्यार्थ्यांना मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम याविषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. उमा उंटवाले, उपाध्यक्षा सविता लाटणे,,सदस्या सुवर्णा इंगवले,मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे,पल्लवी थोरात उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका कापसे मॅडम यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ. सुवर्णा इंगवले मॅडम यांनी मोबाईलवरून आपण शैक्षणिक माहिती, सामान्यज्ञान नवनवीन गोष्टींची माहिती मिळवू शकतो तसेच अद्ययावत ज्ञान प्राप्त करू शकतो परंतु हे करत असताना त्याचा अतिवापर योग्य नाही. अतिवापर मानवी शरीरास घातक आहे हे सांगून मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम समजावून सांगितले. यावेळी सौ. सविता लाटणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पल्लवी थोरात यांनी केले तर कु. माधवी घोगरे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.