सांगोला लायन्स क्लब आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना जगामधील २१० देशांमध्ये ८५०० क्लबच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्धरीतीने समाजाच्या अभ्युदयासाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात मौलिक कार्य करत आहे.लायन्समधील हा सेवाभाव व शिस्त प्रत्येकाला प्रगल्भता देणारी आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना संचालक सन २०१८-२१ ला.डॉ.नवल मालू यांनी केले. कै. गुरुवर्य चं.वि.तथा. बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्षानिमित्त लायन्स क्लब सांगोला कडून आयोजित आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट व जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,प्रांतपाल सन २००९-१०, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रा.धनाजी चव्हाण,प्रांत ३२३४ ड१ प्रथम उपप्रांतपाल ला.भोजराज नाईक-निंबाळकर,द्वितीय उपप्रांतपाल ला.ॲड.एम. के .पाटील रिजन चेअरमन ला. गहिनीनाथ कदम व झोन चेअरमन राजीव कटेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली.यावळी मान्यवरांच्या हस्ते कै.बापूसाहेब व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यांनंतर ध्वजवंदन झाले याचे वाचन ला.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केले.
त्यानंतर लायन्स क्लब सांगोला आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव अमोघ कार्याचा अंतर्गत ‘आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शेला, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच ला.डॉ.नारायणदास चंडक प्रांतपाल सन १९८०-८१ यांचा लायन्समधील उत्तुंग कार्यासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना ला. डॉ.नवल मालू यांनी पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनसाठी लायन्स क्लब सांगोलाचे कौतुक केले व अशा कार्यक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळेल असे सांगत देशासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे सांगितली व लायन्सचे जगामधील नेटवर्क त्याचा होणारा फायदा त्यातून वाढणारी मैत्री सांगत मैत्री विषयी कविता सादर केली.व सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रा. धनाजी चव्हाण व सचिव ला.उन्मेश आटपाडीकर यांना आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. प्रसन्न कासेगावकर, सामाजिक क्षेत्रातून माणगंगा भ्रमण सेवा संस्थेचे वैजनाथ घोंगडे, प्रशासकीय क्षेत्रातून मिनाज मुल्ला, औद्योगिक क्षेत्रातून नितीन बिज्जरगी,सुदाम भोरे, शैक्षणिक क्षेत्रातून बाबुराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.व पुरस्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करत.यापुढेही धवल कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार, विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , पुरस्कार प्राप्त सर्व संस्थेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.सदस्य ला. प्रशांत रायचूरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली, सचिवला.उन्मेश आटपाडीकर यांनी सूत्रसंचालन केले तर खजिनदार ला.प्रा. नवनाथ बंडगर यांनी आभार प्रदर्शन केले.
यांचा झाला सन्मान
सन्मान कर्तृत्त्वाचा गौरव अमोघ कार्याचा अंतर्गत ‘आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट’
वैद्यकीय क्षेत्र’ डॉ.शीतल शहा पंढरपूर डॉ.एम.के.इनामदार अकलूज, डॉ.संजय अंधारे बार्शी, डॉ.प्रसन्न कासेगावकर सोलापूर,डॉ.रणजित केळकर सांगोला,
सामाजिक क्षेत्र’:-प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर,पालवी प्रकल्प पंढरपूर,मातोश्री वृद्धाश्रम, माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था सांगोला, आपुलकी प्रतिष्ठान सांगोला,
‘प्रशासकीय क्षेत्र’ राजश्री पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा,मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी सातारा,सायली पाटील कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग अहमदगर,
‘औद्योगिक क्षेत्र’ नितीन बिज्जरगी सोलापूर,विजय कादे पंढरपूर,सुदाम भोरे सांगोला,राहुल श्रीखंडे सोलापूर,अनिल इंगवले सांगोला, ‘
शैक्षणिक क्षेत्र‘रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी.सांगोला,फॅबटेक एज्युकेशन सोसायटी सांगोला,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान मेडशिंगी,सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर
लायन्स मधील उत्तुंग कार्यासाठी ला.डॉ.नारायणदास चंडक माजी प्रांतपाल सन १९८०-८१



