पारे येथे लाईट शॉर्टसर्किटमुळे कापड दुकान जळून लाखाचे नुकसान

पारे(वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील मौजे पारे येथील कापड दुकानदार बिरा खरात यांनी बेरोजगारीवर मात करत कापड दुकानाचा व्यवसाय सुरू केला.कुटुंबाच्या उपजीविकेसाठी कापड दुकान उभे करुन दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाची उपजीविका करत होते.परंतु 2 डिसेंबर रोजी रात्री 11:00 वाजताच्या सुमारे लाईट शॉर्टसर्किट झाल्याने कापड दुकानाला आग लागून कापड दुकानातील खरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कापड दुकान जळाल्याने युवकाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी हा कापड दुकानाचा व्यवसाय विविध बँकांचे कर्ज घेऊन उभा केला होता. त्यामुळे या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे प्रशासनाने तात्काळ या कुटुंबाला मदत करणे गरजेचे आहे
मेंढपाळ व्यवसाय करून जगणारा समाज आज कुठेतरी सावरत असताना अशा स्वरूपाचे नुकसान झाल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.कुठेतरी मेंढपाळ समाजातील युवक उद्योगांमध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करत असताना नुकसान झाल्याने त्यांचे खच्चीकरण झाले आहे यामुळे विविध क्षेत्रातील नामवंत, दानशूर उद्योगपती,संस्था, राजकीय पुढारी व समाजसेवकांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.या आधारावरच युवक उभा राहू शकतो.असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.