महाराष्ट्र

कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये घवघवीत यश

कोळा:- यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे व सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगोला येथे घेण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोळा विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

सदर स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर-1 सांगोला या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सहावी गटामध्ये कुमारी जोया फिरोज आतार.- द्वितीय क्रमांक तसेच इयत्ता नववी व दहावी गटामध्ये कुमारी हर्षदा अंकुश सरगर (4था ) उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना कुमारी तेहरा तांबोळी मॅडम व श्री सूर्यकांत कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, संस्था सचिव म.शं. घोंगडे सर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे सर पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button