बुद्धेहाळ येथील शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते ज्ञानू कोळेकर यांचे दुःखद निधन

बुद्धेहाळ येथील शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते ज्ञानू कोळेकर यांचे शनिवार दिनांक 16 12 2023 रोजी सकाळी तीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते त्यांचे मृत्यू समयी वय 83 वर्ष होते.
कै गणपतराव देशमुख त्यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे . तिसरा दिवस विधी बुद्धेहाळ येथे सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली