नाझरा विद्यामंदिरच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड

नाझरा(वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची नेट बोल या खेळामध्ये राष्ट्रीय संघासाठी निवड झाली आहे. इयत्ता नववी मध्ये शिकणारे गणेश सिद्धेश्वर चौगुले व तेजस अशोक पाटील या दोन विद्यार्थ्यांचे निवड झाली आहे.
नेट बाॅल असोसिएशनच्या वतीने 29 वी सब ज्युनिअर स्पर्धा झारखंड येथे 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान खेळली जाणार आहे. सदरचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून पूर्व प्रशिक्षण शिबिर भंडारा येथे सुरू आहे.
सदर विद्यार्थ्यांना नाझरा विद्यामंदिर चे क्रीडाशिक्षक चारुदत्त जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील विविध स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.