जवळा येथील श्री.सद्गुरु कचरनाथ स्वामींचे भक्त भोयगाव यात्रेत सहभागी.

जवळा ( प्रशांत चव्हाण) सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त तीर्थक्षेत्र भोयगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे श्री.सद्गुरु कचरनाथ स्वामींच्या यात्रेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत असून जवळे येथील महिला व पुरुष भाविक भक्त श्री.सद्गुरु कचरनाथ स्वामींच्या यात्रेत सहभागी होणार आहेत.
चंपाषष्ठी निमित्त भोयगाव येथे यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तास दुपारचे जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून पंधरा ते वीस हजार भक्तगण यात्रेत सहभाग नोंदवतात. सदरच्या यात्रेसाठी प्रसाद जवळे, कुमठे, वेळापूर, डफळापुर,पाटण या दरबारा मार्फत लोकवर्गणीतून केला जातो. भक्तांना घरी नेण्यासाठी बुंदीचा प्रसाद मिळतो या यात्रेची मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या पालखी मिरवणुकीने सांगता होणार आहे.