डॉ. प्रविण बाबर यांच्या शोधनिबंधास उकृष्ट शोधनिबंध पुरस्कार

आलेगाव ता. सांगोला येथील रहिवाशी आणि सध्या रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज विटा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रवीण बाबर यांच्या शोधनिबंधास शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनोमिक असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ३४ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये डॉ.व्ही.एम.दांडेकर यांच्या नावाने देण्यात येणारा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार शिवाजी विद्यापीठचे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ एम एस देशमुख व ३४ व्या अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ डी के पाटील यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ अनिलकुमार वावरे व सुयेकचे पदाधिकारी उपस्थित होते.
“प्रायव्हेटायझेशन इम्पॅक्ट ऑन लोकल गव्हर्नमेंट सर्विसेस” या विषयवार लिहिलेल्या शोधनिबंधात त्यांनी खाजगीकरणाचा देशातील स्थानिक सरकारांच्या अर्थव्यवस्थांच्यावरती होणाऱ्या परिणामांचा सूक्ष्म अभ्यास या शोधनिबंधात त्यांनी केला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ बाबर यांचे आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर २५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.