सह्याद्री फार्मसीच्या प्राध्यापकांनी मिळवले फार्मसीच्या विविध संशोधनावरील पेटंट :

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ.एम.जी.शिंदे व प्रा.पी.एम.आडत यांनी कॅन्सर रोगावरील उपचार पद्धतीवर पेटंट मिळवले आहे
तर प्रा.व्ही.पी.आणेकर यांनी अँटी-इंफ्लामेंटोरी ऍक्टिव्हिटीचे पेटंट मिळवले.प्राध्यापिका डॉ.एम.जी.शिंदे यांनी टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी फॉर कॅन्सर थेरपी युझिंग गोल्ड नॅनोपार्टिकल्स अँड आर्टीफिसिअल इंटेलिजन्स या विषयावर पेटंट मिळवले तर प्रा.पी.एम.आडत यांनी इम्पलेमेंटेशन ऑफ क्लास ब्यालन्सिंग टेकनीनिकस अँड मशीन लर्निंग अल्गोरिथम फॉर ऍक्युरेट डागनोसिस ऑफ सर्वीकल कॅन्सर विषयावर पेटंट मिळवले.प्रा.व्ही.पी.आणेकर यांनी करकुमीन लोडेड सॉलिडलिपिड नॅनोपार्टिकल्स फॉर अँटी-इंफ्लामेंटोरी युझ या विषयावर संशोधन करून पेटंट मिळवले.
या त्यांच्या पेटंटचा,गंभीर,जीवघेण्या अश्या कॅन्सर आजारावर नवीन उपचार पद्धती यशस्वी करण्यासाठी मदत होणार असून.औषधांचा अधिकाधिक फायदा कॅन्सर आजाराविरोधी लढण्यासाठी कसा होईल तसेच औषधाचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे असे मत यशस्वी प्राध्यापिकांनी मांडले.वरील यशस्वी प्राध्यापिकांचा प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध व्याखयाते प्रा.श्री.गणेश आत्माराम शिंदे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,संस्था सचिवा सौ.सुवर्णा इंगवले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्याच्या शुभेछया दिल्या.