*दहावीच्या परीक्षेत नाझरा विद्यामंदिर चे घवघवीत यश*; *मराठी माध्यम व सेमी माध्यम चा निकाल शंभर टक्के

नाझरा(वार्ताहर):- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील मराठी माध्यम व सेमी माध्यम च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मराठी माध्यमातून मुलाणी अजीम शब्बीर 88.80% गुण मिळवून प्रथम,कुमार कांबळे सुमित पांडुरंग 84.60% गुण मिळवून द्वितीय तर कुमारी सोनार पूनम आनंद 84.20% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत. सेमी माध्यमातून कुमारी शिंगाडे ऋतुजा दिगंबर 94.80% गुण मिळवून प्रथम, कुमारी बनसोडे आरती सचिन 94.60% गुण मिळवून द्वितीय आली आहे तर तृतीय क्रमांकाने बनसोडे प्रवीण विठ्ठल 94.00 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.90 ते 100% च्या दरम्यान 12 विद्यार्थी आहेत,81 ते 89 टक्के च्या दरम्यान 38 विद्यार्थी आहेत.75 ते 80 टक्के च्या दरम्यान 17 विद्यार्थी आहेत तर 70 ते 74 च्या दरम्यान 11 विद्यार्थी आहेत. दोन्ही माध्यमच्या प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेसमोर प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांसमवेत करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकर सावंत,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, मुख्याध्यापक अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,प्रा. प्रकाश म्हमाने व परिसरातील पालकांनी अभिनंदन केले.