सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या चिमुकल्यांनी घेतला ‘मामाचा गाव’ येथे मनमुराद आनंद.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची नर्सरी ते सिनी.केजी या वर्गाची सहल शनिवार दि. 31/12/2022 रोजी संपन्न झाली.
ही सहल कल्पतरू ऍग्रो टुरिझम प्रस्तुत मामाचा गाव, कडलास रोड, सांगोला या ठिकाणी गेली होती. ही सहल सकाळी ठीक 9-00वा.निघाली.मामाचा गाव या ठिकाणी पोहचल्यानंतर श्री. विनोद बेले मामा व पल्लवी बेले मामी यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे स्वागत केले.
स्वागतसमयी विद्यालयातील मुलांना टोप्या व मुलींना गजरे देण्यात आले.
या नंतर विद्यार्थ्यांनी तेथे असणाऱ्या मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. यामध्ये झुलता पूल, झिप लाईन, बैलगाडी रायडिंग,ट्रेन राईड, हॉर्स रायडिंग,टंडम सायकल राईड, बोटिंग , जंगल जीम, मेरीगो राऊंड, घसरगुंडी इ.चा मनसोक्त आनंद घेतला.
तेथील व्यवस्थापकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला. यामध्ये व्यवस्थापनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांना सहलीमधून एकत्र प्रवासाचा आनंद घेता यावा. सहलीतील खेळ, गाणी, गप्पा यामधून मनोरंजन व्हावे. सहलस्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान यांचा लाभ व्हावा. संघभावना, शिस्तप्रियता इ. गुण जोपासले जावेत यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
अशा प्रकारे ही सहल अतिशय आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यासाठी मुख्याध्यापिका कापसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa