महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास संस्था खजिनदार शंकरराव सावंत यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर प्राचार्य अमोल गायकवाड यांनी एन.सी.सी. कॅडेटला शपथ दिली. यावेळी प्रशालेतील अथर्व व सोनम पवार या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले .यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत संचलन केले. तसेच संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांचे हस्ते विज्ञान भित्तीत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके , संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, संस्था सदस्य,माजी प्राचार्य, माजी उपमुख्याध्यापक,माजी उपप्राचार्य,माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे,उत्तम सरगर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहन निवेदन डी.के.पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशितोष नष्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक काकसो नरूटे यांनी केले.

—————–

स्वातंत्र्य लढ्यामध्यील सर्व देशभक्तांबद्दल व थोर स्वातंत्र्यसेनानी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्याबद्दल अतीव कृतज्ञता आहे. देशाला संरक्षणदृष्ट्या बलशाही बनवणारे सैनिक आपले हिरे आहेत त्यांच्या अमोघ कार्याचा आदर करूया.स्वतंत्र भारताचा गेल्या सात दशकातील प्रगतीचा आलेख पाहता भारताला एकात्मतेच्या बळावर शाश्वत विकासाची वाट प्रशस्त करता येईल. संविधान निर्मितीपासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत अनेक टप्प्यावर भारताने आपली एकात्मता सिद्ध केली आहे. आता येणाऱ्या वर्षांमध्ये आर्थिक परिवर्तनाच्या महायज्ञात सहभागी होऊन राष्ट्रहित प्रथम या तत्त्वानुसार समर्पण भावनेने योगदान दिल्यास शंभरावा स्वातंत्र्य दिन साजरा होताना भारत निश्चितपणे विकसित देश बनलेला असेल ..

प्रा.धनाजी चव्हाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button