प्रसाद लोखंडे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी प्रसाद लोखंडे यांनी नुकत्याच झालेल्या श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान, सोलापूर व वालचंद शिक्षण समूह आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2023 मध्ये या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सदर स्पर्धा या सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
प्रसाद लोखंडे यांना मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य नाथाजी कांबळे,प्रा.वरूण वाघमारे,प्रा.विनायक पांढरे यांनी केले असून मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थी प्रसाद लोखंडे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष धर्मराज बोराडे,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पालक व ग्रामस्थ यांनी केले आहे.