खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडुन मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना वाढदिवसाची अनोखी भेट

पेट्रॉनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी मा.आम दिपकआबा साळुंखे पाटील यांची निवड ; सोलापूर जिल्ह्यातील एकमेव निवड
जगातील सर्वात मोठी आणि दर्जेदार शिक्षण संस्था असा लौकिक असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या पेट्रॉनमधून जनरल बॉडी सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रॉनमधून जनरल बॉडी सदस्यपदी निवड झालेले दिपकआबा हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सदस्य आहेत.
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या व्यक्ती सदस्य असलेल्या व्यक्तीमध्ये आबांची निवड झालेली आहे. या पेट्रॉन जनरल बॉडी सदस्यामध्ये माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, पनवेलचे आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांचाही समोवश आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील यांना त्यांच्या जन्मदिनीच रयत शिक्षण संस्थेवर नियुक्ती करून वाढदिवसाची अनोखी भेटच दिली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आज संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात डौलाने बहरत आहे. देशातच नव्हे तर जगात एक दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. जगातील आदर्शवत असणाऱ्या संस्थेचा कारभार सक्षम आणि समर्थपणे चालविण्यासाठी शिक्षणक्षेत्रात बहुमूल्य योगदान असणाऱ्या व्यक्तींची पेट्रॉनमधून जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती केली जाते. महाराष्ट्राचे माजी मंत्री विश्वजित कदम तसेच आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांच्यासह मोजक्याच व्यक्ती पेट्रॉनमधून जनरल बॉडीचे सदस्य आहेत. तब्बल ३५ वर्षाहून अधिक काळ मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देत आहेत. विद्या विकास मंडळ जवळे संचलित १० माध्यमिक प्रशाला, ५ कनिष्ठ महाविद्यालय,१ कृषी विद्यालय, विद्यार्थी वसतिगृह आणि १ महाविद्यालय ते चालवत आहेत. दिपकआबांच्या नावाने ही अनेक शाळा सुरू आहेत. अनेक वर्षांपासून विद्या विकास मंडळ ही संस्था सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात लौकिक असणारी मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे अनेक वर्षांपासून दिपकआबा साळुंखे पाटील अध्यक्ष आहेत. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात असणारे योगदान लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांना पेट्रॉनमधून जनरल बॉडी सदस्य पदी काम करण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ७ जानेवारी रोजी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या जन्मदिनीच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिपकआबांची रयत शिक्षण संस्थेवर निवड केल्याने वाढदिवसाची एक अनपेक्षित आणि अनोखी भेटच त्यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि खास असलेल्या दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेवर अत्यंत मोजक्या आणि नामवंत लोकांसोबत काम करण्याची संधी आपल्या नेत्यांना मिळाल्याने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
रयतमधूनच दिपकआबांनी गिरवले शिक्षणाचे धडे…!
पेट्रॉनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नुकतीच निवड झालेले माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षणही रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथूनच घेतले आहे. शिवाय या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ते अनेक वर्षापासून पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ज्या संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षणाचे धडे घेतले त्याच संस्थेवर अत्यंत महत्त्वाच्या पदावर दिपकआबांना त्यांच्या जन्मदिनापासूनच काम करण्याची संधी मिळाली आहे हा एक विलक्षण योगायोग आहे.