उत्कर्ष विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

सन 2021 -22 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष विद्यालयातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 9 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आणि उत्कर्ष विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमध्ये भर टाकली आहे. काल या विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्कर्ष विद्यालयातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही सत्कार उत्कर्ष विद्यालयातर्फे व विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. सत्कारानंतर स्वरांजली शेंडे व दिबा मणेरी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांचे आभार मानले. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे पालक श्री. टापरे सर, श्री .सपताळ सर आणि सौ .शेंडे मॅडम या पालकांनी त्यांच्या मनोगतातून विद्यालयाने केलेल्या शिष्यवृत्तीच्या तासांच्या नियोजनाचे व विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक केले ..
या कार्यक्रमास पुणे येथील पाटणकर सर ,अनुराधा भावे मॅडम, मुग्धा फडके मॅडम याही उपस्थित होत्या. मा. अनुराधाताई फडके यांनी उत्कर्ष विद्यालयातील विविध उपक्रमांचे व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशाचे खूप खूप कौतुक केले.
तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. संजूताई यांनीही मुलांना उत्कर्ष विद्यालयाच्या पंचसूत्रीचे महत्व सांगून विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे आणि तो विद्यार्थी संस्कारक्षम घडवण्याचे काम उत्कर्ष विद्यालयातील शिक्षक खूप छान करत आहेत असे म्हणून शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच माजी मुख्याध्यापिका मा. भोसेकर बाई यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व माजी मुख्याध्यापिका मा. खडतरे बाई यांनीही मुलांना भेटवस्तू देऊन त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उत्कर्ष विद्यालयाचे संस्थापदाधिकारी मा. देशपांडे मॅडम, मा. शालूताई ,मा. वसुंधरा ताई याही उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. विश्रांती मागाडे बाई , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सुनीताताई कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका मा. स्वरालीताई कुलकर्णी ,माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री. मिसाळ सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्कर्ष विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. कुलकर्णी सर यांनी केले. सूत्रसंचालन कुंभार सर यांनी केले आणि आभार बनसोडे बाई यांनी मानले.