अजंठा आर्ट अकॅडमीच्या पारितोषिक वितरण व कलामहोत्सवाचे रविवारी आयोजन
अजंठा आर्ट अकॅडमी सांगोला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा सन 2022 – 23 चा पारितोषिक वितरण व कलामहोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे सकाळी 11.00 वाजता संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री मा.प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे, पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते संपन्न होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. भारत माळी सर हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून देऊळ बंद, पोस्टर गर्ल, अ. ब. क, बंदीशाळा, 66 सदाशिव, परफ्युम, भिरकिट चित्रपट फेम अभिनेत्री मा. आर्या घारे या उपस्थित राहणार आहेत. तसेच इस्लामपूर येथील पक्षीमित्र श्री. शंकर कुलकर्णी, बालसाहित्यिक मा. श्री. शिवाजी बंडगर, सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी च्या संचालिका सौ.सितादेवी चौगुले, संजीवनी हॉस्पिटल सांगोला येथील सर्जन डॉ. श्री. सुधीर ढोबळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ प्रदेश उपाध्यक्ष श्री. रामचंद्र इकारे, मंगळवेढा येथील अक्षरमित्र श्री. अमित भोरकडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष श्री. शिवभूषण ढोबळे सर यांनी दिली. सदर कार्यक्रमास सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, सातारा, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षक, विद्यार्थी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात उपक्रमशील प्रशाला, कलाप्रेमी मुख्याध्यापक, कलाभूषण पुरस्कार तसेच शिशुगटा पासून इयत्ता 12 वी पर्यंतच्या 6 गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे .
याप्रसंगी तालुका व परिसरातील निवडक कलावंतांचा काव्य गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, तबलावादन, प्राणी पक्षांचे आवाज ,लावणी अशा भारदार कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना मिळणार असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन अकॅडमीचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत दिक्षीत सर, सचिव श्री. श्रीकांत बंडगर सर ,स्पर्धाप्रमुख श्री. अरुण बंडगर सर यांनी केले आहे. याप्रसंगी कार्यकारणी सदस्य श्री. धनंजय शेळके सर, श्री. गणेश पुंडेकर सर, श्री. सिद्धार्थ मोटे सर ,श्री. शिवराज ढोबळे सर, श्री. अविनाश दबडे सर, श्री. हनुमंत माळी सर, श्री. प्रशांत पोरे सर, श्री बंडोपंत चव्हाण सर, सौ. पल्लवी थोरात, सौ. कविता पाटील, सौ. प्रतिभा मस्तुद मॅडम इत्यादी उपस्थित होते. तरी कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाकडून करण्यात येत आहे