ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिरचे सुयश

दोन खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड
सांगोला (प्रतिनिधी)दि.31डिसेंबर 2022 रोजी राळेगणसिद्धी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झालेल्या ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील (19 वर्षे वयोगट मुले) कुमार हर्षराज शामराव जगताप, विभागस्तर द्वितीय ऋतुराज अमोल राजूरकर विभागस्तर तृतीय.
वरील दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे एनसीसी विभाग प्रमुख श्री मकरंद अंकलगी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष मा.प्रा प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं.घोंगडे सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्थासदस्य विश्वेशजी झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान सर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे सर, उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक-श्री अजय बारबोले सर, पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक),बिभीषन माने, ज्युनिअर कॉलेज क्रीडा प्रमुख प्रा. डी के पाटील, क्रीडाशिक्षक नरेंद्र होनराव, प्रा. सचिन चव्हाण,संतोष लवटे, सुभाष निंबाळकर, प्रा.राहुल इंगोले,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



