सांगोला महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम व स्वच्छता रॅली संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : स्वच्छता ही समृद्धी घेवून येत असते त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छते विषयी जागरूक असणे गरजेचे आहे. महात्मा गांधीना अभिप्रेत असणारा स्वच्छ व सुंदर भारत घडवण्यासाठी देशातील तरुण वर्गावर स्वच्छतेचे संस्कार होण्यसाठी संपूर्ण देशभर ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम देशात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविली जात आहे त्याचाच भाग म्हणून सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम रावबली जात आहे . या मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांगोला नगरपरिषद यांच्या वतीने सांगोला एस.टी . बस स्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एस.टी. बस स्थानकामध्ये व बस स्थानक परिसरातील प्लास्टीक चा कचरा व गवत काढून बस स्थानक स्वच्छ केले. या कार्यात सांगोला नगरपरिषद व सांगोला बस स्थानकाचे आगारप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
तसेच स्वच्छते विषयी जनजागृती घडावी म्हणून सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सांगोला महाविद्यालया पासून सांगोला शहरामध्ये स्वच्छता रॅली चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छते संबंधी जनजागृती करण्यासाठी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला . या स्वच्छता मोहिमेसाठी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रम अधिकारी डॉ नवनाथ शिंदे , डॉ.प्रकाश पाटील, प्रा. वासुदेव वलेकर, डॉ भारत पवार यांनी या स्वच्छता मोहिमे मध्ये सहभाग नोंदवला.