sangolamaharashtra

सांगोल्यात जागतिक सायकल दिन साजरा

*सायकलिंग आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे :- नीलकंठ शिंदे सर*

HTML img Tag Simply Easy Learning    
जागतिक सायकल दिनानिमित्त सांगोला सायकलर्स क्लबतर्फे  राईडचे राष्ट्रीय महामार्ग NH 166 या मार्गावर आयोजन करण्यात आले होते.यावेळी जागतिक सायकल दिनानिमित्त बोलताना बाळासाहेब टापरे सरांनी शारीरिक तंदुरुस्तीतून उत्तम आरोग्य सायकलचा प्रचार व प्रसार करून प्रदूषण कमी करणे व सायकलिंग हा खेळ प्रकार ग्रामीण भागात माहिती व्हावा याकरिता हा क्लब विविध राईडचे आयोजन करीत असलेचे सांगितले.
आरोग्यदायी जीवनासाठी सायकल चालवणे हा अनेक सायकलिस्ट यांचा शिरस्ता बनला आहे सांगोल्यातील अनेक तरुण, व्यापारी तसेच इतर क्षेत्रातील बरेच जण सायकल शर्यतीत भाग घेत आहेत त्यामुळे सांगोल्यातील सायकल शर्यतीची क्रेझ निर्माण झाल्याचे युवा सायकलिस्ट युवा सायकलिस्ट  नीलकंठ शिंदे सर  यांनी सांगितले.
सांगोल्यातील सर्व क्षेत्रातील सायकलिस्टने सुरुवातीस सायकल चालवायला सुरुवात केली सायकल शर्यतीची आवड निर्माण करण्यासाठी सांगोला सायकलर्स क्लबची स्थापना करण्यात आली .आज या ग्रुप मध्ये 78 सदस्य आहेत ते दररोज 30  किलोमीटरची सायकल राईड करतात. दर रविवारी ते 50 ते 60 किलोमीटर ची सायकलिंग करतात यात ते प्रामुख्याने  नागपूर -रत्नागिरी मार्गावर सांगोल्यापासून अनकढाळ टोल प्लाजा, नाझरा, चिनके,हातीद ,जुनोनी, नागज, सोनंद,सिंगनहळी ,शेगाव ,जतपर्यंत सायकलिंग करतात यामधील काही जण लांबपल्ल्याच्या राईड मध्ये सहभाग नोंदवून पर्यावरण जपण्याचा संदेश देतात. सायकलिंगची आवड निर्माण व्हावी म्हणून या ग्रुपतर्फे व्यायामाविषयी जनजागृती करण्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे. सांगोला शहरात सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र सायकलिंग मार्ग करावेत अशी मागणी ही नगरपरिषदेकडे केली आहे . सांगोला सायकलर्स क्लबमधील ऍक्टिव्ह मेंबर नीलकंठ शिंदे सर यांनी वाघा बॉर्डर (पंजाब), अमृतसर ,जम्मू काश्मीर, कन्याकुमारी (संपूर्ण दक्षिण भारत) व भारताबाहेर बांगलादेश ,नेपाळ ,भूतान या देशांना भेटी देऊन शांतता ,एकता ,समतेचा संदेश या सायकलींगच्या माध्यमातून दिला आहे. यानंतरच्या काळात देखील ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून सांगोल्याचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न असल्याचे या सायकल दिनानिमित्त त्यांनी सांगितले.
 सांगोला शहराजवळ घडलेल्या अपघातात मंगळवेढा येथील सायकलिस्ट सुहास ताड यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना यावेळी सांगोला सायकलर्स क्लबच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सांगोला क्लबचे सायकललिस्ट व नागरिक उपस्थित होते.
आरोग्यसह प्रदूषण मुक्तीसाठी सायकलिंग गरजेचे आहे.
सायकलिंगचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वयोमान वाढते, मधुमेहाचा धोका घटतो .रक्तदाब नियंत्रणात राहतो. शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या उत्तम आरोग्यकरिता दैनंदिन सायकलिंग करावी, सायकलिंग आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन जागतिक सायकल दिनानिमित्त शिंदे सर यांनी सांगितले:-नीलकंठ शिंदे सर,
सायकल प्रेमी
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!