दीपक आबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सांगोला या संस्थेची सर्वसाधारण कर्ज मर्यादा 07 लाख वरून 08 लाख रुपये
सांगोला :- मा.आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था वाटचाल करत असून शुक्रवार दिनांक 31/05/2024 रोजी पार पडलेल्या संस्थेच्या मासिक मीटिंगमध्ये कर्ज मर्यादा 07 लाख वरून 08 लाख करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थेचे चेअरमन श्री वसंत बंडगर सर यांचे अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये घेण्यात आला,
मागील वर्षभरात सोसायटीच्या कारभारात आमुलाग्र बदल घडवून आणून सभासदांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम*सर्व संचालक मंडळ करीत आहे. त्यामुळे सोसायटी यशाचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. सोसायटीचा कारभार कसा सुधारतो आहे हे पुढील काही बाबींमुळे समजून येते *आर्थिक वर्ष सन 2023-2024 मधील सभासदांचे कायम ठेवीवरील व्याजवाटप करताना .कर्जवाटप थांबविण्याची वेळ यावेळी आली नाही. * पस्तीस लाख रुपये इतके व्याज वाटप अगदी सहजपणे व ताबडतोब संबंधितांच्या खात्यावर जमा* करण्यात आले सर्वसाधारण कर्जमर्यादा वाढवून 07 लाखावरून 08 लाख इतकी करण्यात आली आहे.
याशिवाय शैक्षणिक कर्ज 1 लाख रुपये आणि तातडीचे कर्ज 30 हजार रुपये दिले जात आहे ,सर्वात कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणारी ही जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था असून व्याजदर 7.20% आहे, ह.भ. प.शारदादेवी साळुंखे पाटील लक्ष्मीनारायण शुभ मंगल योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलांच्या शुभविवाहाप्रित्यर्थ 30,000/- रुपयांची मदत संस्थेमार्फत केली जाते,दरमहा कर्ज वाटपासाठी कोणतीही पेंडिंग अगर वेटिंग लिस्ट नाही , कर्जासाठी सर्व कागदपत्रे अचूक व परिपूर्ण जमा केल्यास अगदी त्याच महिन्यात कर्जाचा चेक खात्यावर जमा केला जात आहे, वरील सर्व गोष्टी पाहिल्यानंतर दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने सोसायटी मार्गक्रमण करीत आहे असे दिसून येते अर्थात आणखी बरीच कामे करणे बाकी आहे. सुधारणांना अजून बराच वाव आहे. हे नम्रपणे मान्य करून सभासदांच्या हितासाठी आणि सोसायटीच्या *प्रगतीसाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न विद्यमान संचालक मंडळ ,सभासद बंधू भगिनी , संस्थेचे सचिव व कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात येईल.*संस्थेच्या सर्व सभासदांचा विश्वास,सहकार्य लाभले,त्याबद्दल संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींचे मनःपूर्वक खूप खूप आभार,तसेच सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ परिवारातील पदाधिकारी व नेते मंडळींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक खूप खूप आभार यापुढेही सुधारणेचा हाच वसा घेऊन संचालकमंडळ काम करेल यात कोणत्याही प्रकारची शंका असणार नाही सदर बैठकीस संस्थेचे चेअरमन वसंत बंडगर सर व्हाईस चेअरमन सौ कमल खबाले मॅडम ,संचालक आणि माजी चेअरमन तानाजी साळे सर,संचालक आणि माजी चेअरमन कुमार बनसोडे सर, संचालक संजय गायकवाड सर, संचालक विलास डोंगरे सर,संचालक रफिक शेख सर , संचालक माणिक मराठे सर ,संचालक गोविंद भोसले सर, संचालक महादेव नागणे सर आणि संचालिका पल्लवी मेणकर (महाजन) मॅडम ,तज्ञ संचालक कैलास मडके सर आणि संस्थेचे सचिव अमर कुलकर्णी उपस्थित होते