विद्यामंदिर प्रशाला मध्ये दहावीचा स्नेह मेळावा संपन्न

तब्बल 31 वर्षांनी भेटले विद्यामंदिर चे 100 मित्र मैत्रिणी
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथील 1991 शैक्षणिक वर्षातील दहावीतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा एकमेकांना भेटण्याचा स्नेह मेळावा मोठ्या थाटात आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.
तब्बल 31 वर्षांनी होणाऱ्या सर्वांच्या एकत्रित भेटीने वातावरण प्रफुल्लित झाले होते. त्यासाठी बाहेरगावाहून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य म.सी. झिरपे, म.श. घोंगडे, सुधीर उकळे, संजीव नाकील, सय्यद सर, यादव सर, म. ज. घोंगडे, दिगंबर जगताप, ह. द. माळी, मा. कू. बोरकर, समाधान खाडे, भीमाशंकर पैलवान, आडके मॅडम, बनकर सर, सोनलकर सर, भोईटे सर, नागन्नाथ गयाळी, नारायण राऊत आधी आजी-माजी शिक्षक वृंद यांचा सन्मान करण्यात आला. तर त्यांच्यासमोर 31 वर्षापूर्वीचे विद्यार्थी तर सध्याचे डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, राजकीय पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, व्यावसायिक शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते. सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये शिक्षण घेणारे 100 मित्र मैत्रिणी तब्बल 31 वर्षांनी एकत्र आल्याने जुन्या आठवणीने आणि शालेय गप्पाने हॉल गजबजून गेला होता. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला. माजी विद्यार्थी डॉ. आनंद मस्के, रफिक मकानदार एसपी प्राचार्य पोलीस ट्रेनिंग सेंटर खंडाळा, ॲड. सारंग वांगीकर, मकरंद अंकलगी, आयुब पटेल, प्रमोद शिंगे भारती झिरपे, वंदना पाटणे, बिपिन मोहिते, गजानन बिले, सुरेखा कुंभार, वंदना गोरे, रूपाली पत्की आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. काही माजी विद्यार्थ्यांचा कराओके गायनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर लोखंडे, अँड. आयुब पटेल, मकरंद अंकलगी, सतीश खडतरे, योगेश कांबळे, निसार तांबोळी, समीर मनेरी, राजू कोळेकर, शरण सलगरे ॲड. सारंग वांगीकर, गजेंद्र अरबळी, भारत बनकर, आधी सह सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती झिरपे, वंदना पाटणे तर आभार अमर दादा लोखंडे यांनी मानले.