सांगोला तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

सांगोला(अमर कुलकर्णी ) ऋषिकेश बुक डीलर सांगोला येथे पत्रकार दिनानिमित्त सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पुस्तकरुपी ग्रंथभेट देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका ग्रंथालाय संघाचे संस्थापक अध्यक्ष ,सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील होते .
यावेळी पञकार प्रतिनिधी यांचेवतीने मनोज उकळे सर यांनी मनोगत व्यक्त करून ग्रंथालय संघास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी सतिश सावंत ,मोहन मस्के ,नागेश जोशी , अनिल कुलकर्णी ,अशोक बनसोडे ,किशोर म्हमाणे ,अरुण लिगाडे ,दत्ताञय खंडागळे ,गुलाम गौस तांबोळी ,मिनाज खतीब ,दिलीप घुले ,नावेद पठाण ,दिपक भाकरे ,जगदीश कुलकर्णी ,सुरेश गंभिरे ,औंदुबर काळे इत्यादी पत्रकारांनी उपस्थिती लावली होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रंथालय संघाचे सहसचिव संजय सरगर,संचालक दत्ताञय काशिद ,दत्ताञय पाटील ,एकनाथ फाटे, अमर कुलकर्णी इत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूञसंचालन ,आभार प्रदर्शन तालुका संघाचे सचिव अशोक व्हटे यांनी केले..