हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय कराटे व किकबॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश

सांगोला(प्रतिनिधी):-हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन सांगोल्याचे, नेपाळ काठमांडु येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे व किकबॅाक्सिंग स्पर्धेमध्ये 5 पदकांची भर घातली. दि.29 ते 31 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय कराटे व किक बॅाक्सिंग स्पर्धा आपल्या भारत देशाच्या टिम मधुन खेळण्याचा पहिला मान मिळवत सोलापुर जिल्हा सांगोला तालुक्यातील हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशनने मानाचा तुरा रोवला.
75 किलो वजनी गटात किशोर केदार- 1 सुवर्ण पदक, 70 किलो वजनी गटात यश भंडारे- 2रौप्य पदक, थश-55 किलो वजनी गटात सत्यम बाबर- 1 कास्य पदक, 50 किलो वजनी गटात आण्णासाहेब रड्डी -1कास्य.
सांगोला शहराच्या इतिहासात पाहिल्यांदाच कराटे व किक बॅाक्सिंग घगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व किशोर केदार व त्यांच्या विद्यार्थ्यांनी नेपाळ काटमांडू येथे केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॅा बाबासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेड सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार, इंजि.रमेश जाधव, शिवप्रेमी बाळासाहेब शिंदे व पालक वर्गातुन अजयकुमार बाबर गुरूजी ,कृषी अधिकारी रावसाहेब रड्डी , विजय भंडारे ,हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष कबड्डी प्रेमी वैभव केदार व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदनक करुनयशस्वी विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.