ग्राहक पंचायतीच्या वतीने सांगोल्यात पत्रकारांचा सन्मान

सांगोला(प्रतिनिधी):-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सांगोला यांचेवतीने मराठी वृत्तपत्र सृष्टीतील पहिले पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मदिनानिमित्त साधून सांगोला शहर व तालुका परिसरातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी सांगोला येथून प्रसिद्ध होणार्या दैनिक व साप्ताहिकाचे संपादक, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी आदी विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गेल्या वर्षभरात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून अन्याय न्याय मिळवून देण्यासाठी व प्रशासनाचे विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडणारे व कोरोना सारख्या काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावणार्या पत्रकारांच्या उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आले.
महात्मा फुले चौकात शहर व तालुक्यातील सुमारे 40 पत्रकारांचा गुलाब पुष्प व अल्पपहार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित पत्रकार बंधूंचे स्वागत ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व आभार सचिव वामनराव देशमुख यांनी मांडले.
यावेळी ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक पत्रकार नागेश जोशी व जिल्हा कार्यकारणी सदस्य डॉ.अनिल कांबळे, संघटक डॉ.मानस कमलापूरकर, सदस्य अजय देशमुख आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सांगोला शहरात प्रथमच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वतीने पत्रकारदिनी पत्रकारांचा सन्मान करून पुढील कार्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व पत्रकारांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याचे कौतुक करून पदाधिकार्यांना धन्यवाद दिले व आनंद व्यक्त केला.