सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या कर्ज मर्यादेत भरघोस वाढ
सभासदांना यापुढे मिळणार एकूण 11 लाख 50 हजार रुपये कर्ज.
सांगोला:– प्राथमिक शिक्षकांच्या विश्वासासपात्र असणारी,सभासदांचे हित जपणारी व प्रत्येक सभासदाच्या विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोला या संस्थेच्या 7 डिसेंबरच्या मासिक सभेमध्ये कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमित कर्ज -10,00,000 लाख,तातडीचे कर्ज – 50,000 हजार , शैक्षणिक कर्ज-1,00,000 लाख असे एकूण 11,50,000 कर्ज मिळण्याची मर्यादा झाली आहे. त्याचा फायदा सुमारे 800 सभासदांना होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बालाजी चोपडे यांनी सांगितले.
सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी ही सचोटीने कारभार करणारी संस्था असून सभासदांचे हित पाहून पतसंस्थेमध्ये काटकसरीने कारभार केला जातो. पतसंस्थेच्यावतीने वेगवेगळ्या अनेक योजना राबविल्या जातात. सभासदाचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण कर्ज माफ करून एक लाख रुपये मदत निधीच्या रूपाने दिले जातात. तसेच सभासदाच्या एका पाल्याच्या विवाहासाठी शुभमंगल विवाह योजनेद्वारे भेट म्हणून 25 हजार रुपये चेकद्वारे दिले जातात. तसेच पतसंस्थेच्या वतीने मुदत ठेव योजना सुरू केली असून ठेवीसाठी 7.20 शेकडा दराने व्याज दिले जात आहे, असे उपाध्यक्ष मधुकर भंडारे यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक अंकुश बुरंगे, अंकुश गडदे,निसार इनामदार,तात्यासाहेब देशमुख,काकासाहेब सावंत,प्रमोद इंगोले, तज्ञ संचालक संजयकुमार नवले, चिटणीस विजय शेंडे,डाटा ऑपरेटर भीमराव रोकडे,सेवक आमीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.