सांगोला विद्यामंदिर येथे 8वी शिष्यवृत्ती पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न

सांगोला(प्रतिनिधी): सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे शनिवार दिनांक 7/1/2023 रोजी पालक-शिक्षक सहविचार सभेचे आयोजन केले होते.या सभेमध्ये पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी काही सूचना देत उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक पर्यवेक्षक केदार सर यांनी केले.
यानंतर विभागप्रमुख बिले सर यांनी झालेल्या टेस्टच्या गुणांचा आढावा व परीक्षेपर्यंत करावयाची कार्यवाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीचे नियोजन यासंबंधी माहिती दिली.
यानंतर काही पालकांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले यामध्ये श्री मनोहर पवार,श्री माळी सर,श्री नामदेव चव्हाण,श्री अजित पाटील,सौ.दिपाली नागणे यांनी आपले मत व्यक्त केले.
संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख श्री चौगुले सर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न,तसेच झालेल्या टेस्टचे गुण व विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर यश यावर आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापक जांगळे सर यांनी पालकांनी विचारलेल्या शंकांची समाधानकारक उत्तरे देत व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राहिलेल्या दिवसांचे नियोजन कसे करावे याबाबत विचार व्यक्त केले.
सदर पालक-शिक्षक सहविचार सभेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पैलवान सर उपमुख्याध्यापक जांगळे सर,पर्यवेक्षक केदार सर,संस्था बाह्यपरीक्षा प्रमुख चौगुले सर,प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख खंडागळे सर,मार्गदर्शक धुकटे सर,मार्गदर्शन वर्गाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,सुज्ञ पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार कु.पलसे शु.सं.यांनी मांडले,तर सूत्रसंचालन श्री नष्टे अ. अ.यांनी केले