ना कार्यकर्त्यांना झळ… ना पाहुण्यांना झळ….आपलाच डबा खाऊन..! ताई बळीराजाच्या प्रश्नावर शिवारात

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयममालाताई गायकवाड यांच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर जिल्ह्याचे कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांची छोटी बहीण म्हणजेच सोलापूर जिल्ह्याच्या लाडक्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयममालाताई गायकवाड यांनी सांगोला तालुक्यामध्ये 9 जानेवारीपासून गाव भेट दौरा आयोजित केला. या गाव भेट दौऱ्यामध्ये ताईंनी खुद्द ना कार्यकर्त्यांना झळ.. ना पाहुण्यांना झळ ही भूमिका बाळगत स्वतःच बनवलेला डबा खाऊन थेट बळीराजाच्या प्रश्नावर शिवारात जाऊन चर्चा करत आहेत व तालुक्यातील अनेक नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न बांधावर जाऊन सोडवत असल्याने त्यांच्या या गाव भेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सांगोला तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून साळुंखे-पाटील या कुटुंबाकडून जनसेवेचा वसा हा सुरू आहे.परंतु जयमालाताई यांनी प्रत्येक नागरिकापाशी जाऊन अडीअडचणी सोडवून असणाऱ्या शासकीय योजना प्रत्येक प्रश्नावर उत्तर ही भूमिका ठेवली असून पीएम किसान योजना, श्रावण बाळ योजना,विधवा योजना, अपंग योजना, रेशन कार्ड,सेतू ,रोजगार हमी योजना, कृषी, रस्ते ,पाणी, शिक्षण,आरोग्य अशा असंख्य योजना नागरिकांसमोर मांडून त्यांच्यावर तात्काळ अंमलबजावणी करून प्रत्येक योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना नागरिकांना मिळण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत ना वारा.. ना थंडी कुठलाही विचार न करता गेले तीन ते चार दिवस सांगोला तालुक्यामध्ये पायाला भिंगरी लावून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम ताई यांच्या माध्यमातून संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये सुरू आहे.
आतापर्यंत त्यांनी अनेक गावांचे दौरे पूर्ण केले असून या गावाच्या माध्यमातून त्यांना सकारात्मक उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे व माता-भगिनी कडून मोठ्या स्वरूपात कौतुक करून त्यांच्याशी मोकळेपणाने आपल्या घरातील सदस्य प्रमाणे हेवा वाटावा अशी भूमिका ठेवून काम करत असल्याने सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर या गावभेट दौऱ्यामध्ये मा.सरपंच संतोष पाटील, विजय पवार सर,दादा हरिहर, शिंदे मॅडम, गायकवाड मॅडम, हे ताईंसोबत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
भर उन्हात… रस्त्यावर गाड्या थांबवून” ताईंशी” नागरिकांच्या चर्चा
दीपकआबांच्या कामाचा हेवा सर्वांनाच वाटत असतो आणि ह्याच कामाचा हातगंडा ताईंनी आत्मसात केल्यामुळे भर रस्त्यावर देखील गाडी थांबवून नागरिक आपल्या अडचणी सांगून सोडवून घेत आहेत थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नाचे उत्तर मिळत असल्यामुळे जयमालाताई यांचे कौतुक सर्व जनमाणसातून केले जात आहे. ताईनी या गाव भेट दौऱ्यामध्ये स्वतःच्या हाताने बनवलेला डबा देखील त्या शेतकऱ्याच्या शिवरात खाऊन शेतकऱ्यांच्याच प्रश्नाला न्याय देण्याचे काम गेल्या तीन ते चार दिवसापासून अहोरात्र करीत आहेत.