सांगोला येथे अविस्मरणीय स्नेहमेळावा संपन्न

रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सांगोला विदयामंदीर प्रशाला येथे १९९१ चे इयत्ता दहावीचे बॅचमधील विदयार्थी विदयार्थीनींचा स्नेहमेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात गुरुवर्य बापुसाहेब झपके व शोभनतारा (बाईसाहेब) झपके यांचे प्रतिमा पुजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मकरंद अंकलगी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देवुन स्नेहमेळाव्याची कल्पना कशी साकारली याची माहीती दिली. तत्कालीन प्राचार्य म.सि. झिरपे, विदयमान प्राचार्य भिमाशंकर पैलवान संजीव नाकील, सय्यद सर, म.ज. घोंगडे, दिगंबर जगताप, समाधान खाडे, म.शं. घोंगडे, सुधीर उकळे, रा. सो. पतंगे, आडके मॅडम, बनकर सर, यादव सर, माळी सर, सोनलकर सर, बोरकर सर, नवले सर, शिक्षकेतर कर्मचारी नागन्नाथ गयाळी, नारायण राउत यांना गौरवचिन्ह देवून सन्मानित करणेत आले.
यावेळी सन्मानित गुरुवर्यांनी ३१ वर्षापुर्वीचे आठवणींना उजाळा देवुन विदयार्थ्यांनी गुरूंच्या शिक्षण व संस्काराची दिशा उज्वल व्यक्तीमत्व यांनी घडवुन सार्थकी आणलेचे सांगीतले. स्नेहमेळाव्यात नाकील सर व जगताप सर जुन्या आठवणींना उजाळा देवुन वर्ग घेतला आणि ३१ वर्षानंतर माजी विदयार्थ्यांचे आनंदाश्रु अनावर झाले.
यावेळी माजी विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून गुरुज्ञान आणि गुरुसंस्कार व्यक्तीमत्व कसे घडवितात हे सांगुन काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. आदर्श शिक्षीका भारती झिरपे व वंदना पाटणे यांनी अतीशय सुरेख सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी सर्व माजी विदयार्थी यांना स्नेहमेळाव्याची आठवण म्हणुन फ्रेमसह ग्रुप फोटो भेट म्हणुन देणेत आले. कार्यक्रमात ७८ माजी विदयार्थी व १८ निवृत्त शिक्षक यांनी सहभाग घेतला तसेच विदयार्थीनी अर्चना जोशी हीने नॉर्थ कॅरोलायना अमेरीका येथुन या स्नेहमेळाव्यात व्हीडीओ कॉन्फरन्स दवारे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमर लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेकरीता नियोजन समितीने विशेष परीश्रम घेतले.