राजे शिवाजी इंग्लिश मेडियमची स्कूलची शैक्षणिक सहल संपन्न

राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली ही सहल कोकण दर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या सहलीमध्ये 85 विद्यार्थी तसेच आठ शिक्षकांनी सहभाग घेतला. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी श्रीक्षेत्र जोतिबा, मार्लेश्वर देवस्थान मारळ, मारलेश्वर धबधबा, श्री शेत्र गणपती मंदिर गणपतीपुळे, स्वामी स्वरूपानंद समाधी पावस, विजयदुर्ग किल्ला आधी ठिकाणांना भेटी दिल्या . तसेच कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा मनमुराद आनंद लुटला. सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री काटे सर, संभाजी कोकरे सर,संतोष रणदिवे सर, तानाजी गोत् सूर्य सरतसेच सर्व महिला शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.