आगामी सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार .आ महादेव जानकर

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी पंढरपुरात रासप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितले
येथील तनपुरे महाराज मठात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार यावेळी करण्यात आला
पुढे बोलताना आमदार जानकर म्हणाले की रासपाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभा या निवडणुकीसाठी आपापल्या कार्यकर्त्याने आपापल्या मतदारसंघात कामाला लागावे युती संदर्भात बोलताना आमदार जानकर म्हणाले की जो पक्ष आपणाला सन्मानाने जागा देईल त्याबरोबर आपण युतीसंदर्भात विचार करू असे ते म्हणाले
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव कुमार सुशील राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे ,प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते प्रदेश मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर प्रदेश सरचिटणीस आबासाहेब मोटे प्रदेश सदस्य वैशाली वीरकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष सुनील बंडगर ,अजित पाटील ,पंकज देवकाते कालिदास गाढवे ,प्रकाश खरात ,जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट शरदचंद्र पांढरे ,जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने ,माळाप्पा खांडेकर तालुकाध्यक्ष संजय लवटे ,संतोष मासाळ ,दामाजी मेटकरी ,अनिल हे गडकर ,नागनाथ मदने, संजय हाके उपस्थित होते