सुभेदार माणिक बाबर यांचा माजी सैनिक कल्याणकारी संघाच्या वतीने सांगोला येथे सपत्नीक सत्कार

मानेगावचे रहिवासी सुभेदार माणिक बाबर यांनी भारतीय सेनेमध्ये २८ वर्षे सेवा करून निवृत्त झाले बद्दल माजी सैनिक वस्तीग्रह सांगोला येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला ..
माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे वतीने आर्मी,एअर फोर्स, नेव्ही या दलामध्ये जे जवान आपली सेवा पूर्ण करून आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्याची परंपरा चालू ठेवली आहे .सांगोला तालुक्यातील मानेगावचे सुपुत्र सुभेदार माणिक बाबर यांनी भारतीय सेने मध्ये (इंडियन आर्मी)२८ वर्षे आपली सेवा 15 मराठा लाईफ इन्फंट्री म्हणजे बुरुज बटालियन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली. आपल्या सर्विस मध्ये यांनी यु एन मिशन, काँगो ऑपरेशन, जम्मू काश्मीरमध्ये नऊ वर्षे सेवा देत असताना बऱ्याच आतंकवादी कारवाई विरुद्ध त्यांना लढा द्यावा लागला या वेळेस त्यांना वेगवेगळ्या कमांडेशनने सन्मानित करण्यात आले .
माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सुभेदार माणिक बाबर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सैनिकांना सेवेमधून आल्यानंतर काही अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी माजी सैनिक कल्याणकारी संघटना कार्य करते. सदर सत्कारास संघटनेचे पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.