सांगोला तालुका

शहीद जवान संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व  युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

शहीद जवान संस्थेच्या वतीने नेहरू चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती व  स्वामी विवेकानंद जयंती साजरी  मोठ्या उत्साहाने करण्यात आली..
सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माजी नगरसेविका सौ.स्वाती मगर यांच्या हस्ते पुष्पहार पण करण्यात आला व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस युवा नेते अजय इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  इनरव्हीलच्या सचिव सौ.स्वाती अंकलगी  यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर माजी नगरसेविका सौ.स्वाती मगर व अजय इंगवले यांनी आपले विचार व्यक्त केले
   या कार्यक्रमाला अँड.मिलिंद हिरफोडे, पत्रकार उत्तम चौगुले सौ.संगीता चौगुले, इनरव्हीलच्या वलबच्या ठोंबरे, राजू मगर, देवा मासाळ अजित जाधव निलेश कसबे इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!