सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे बुद्धिबळ स्पर्धेत सुयश; पुजा येलपले विभाग स्तर पाचवी राज्यस्तरासाठी निवड

सांगोला ( प्रतिनिधी ) दिनांक ११ व १२ जानेवारी २०२३ रोजी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे झालेल्या विभागस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील कुमारी पूजा कांतीलाल येलपले (इ.१२वी शास्त्र ब) या खेळाडूने विभाग स्तरावर पाचवा क्रमांक मिळविला. तसेच तिची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सहसचिव मा.प्रशुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सदर यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.व राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी खेळाडूंला ज्युनिअर कॉलेज क्रीडा प्रमुख प्रा. डी के पाटील, क्रीडाशिक्षक नरेंद्र होनराव, प्रा. सचिन चव्हाण, संतोष लवटे, सुभाष निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके , सचिव म. शं.घोंगडे, संस्थाकार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार (क्रीडा नियंत्रक), बिभिषण माने ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.