सांगोला तालुका

नगरपरिषदेच्या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल- आ.शहाजीबापू पाटील

सांगोला(प्रतिनिधी):-प्रशासकीय इमारती सर्व सुखसोयींनीयुक्त असणे काळाची गरज आहे.  सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिवाय नगरपरिषदेच्या गाळ्यात फर्निचर करून अभ्यासिका तयार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल.असा विश्वास आ.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर करणे व नगरपरिषदेच्या गाळ्यात फर्निचर करुन अभ्यासिका तयार करण्याच्या एकूण 74 लाख रु.रक्कमेच्या विकासकामांचे भूमिपूजन काल शनिवार दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी  मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी आ.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी  माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, अनिलभाऊ खडतरे, तानाजीकाका पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, अ‍ॅड.उदयबापू घोंगडे, दिलावर तांबोळी, बाबासाहेब बनसोडे, अरुण बिले, विनोद रणदिवे, समीर पाटील, दादासाहेब खडतरे  यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास केंद्रे म्हणाले, अभ्यासिकेमुळे सांगोला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अभ्यासिकेमध्ये 40 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार असून परीक्षा घेवून विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आनंद घोंगडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!