सांगोला येथे बंद घराचे कुलुप तोडून ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

सांगोला (प्रतिनिधी) :-अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून वीस हजार रुपये रोख व अर्ध्या तोळ्याची सोन्याची रिंगा असा सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सांगोला शहरातील विद्यानगर येथे उघडकीस आली आहे.
रमेश लक्ष्मण येडगे रा. विद्यानगर सांगोला हे शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप सोडून कपाटातील वीस हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किमतीची सोन्याचे अर्धा तोळ्याचे रिंगा असा ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत रमेश येडगे यांनी अज्ञात चोरट्याने घराचे तसेच ऑफीसचे कुलूप तोडुन आत मध्ये प्रवेश करून वरील मुद्देमाल चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली आहे तसेच चोरट्याने शेजारी राहणाऱ्या राजु वालवाडकर यांची मोटार सायकल पण बोरीस गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.