सांगोला महाविद्यालयात जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी: महिला तक्रार निवारण समिती व भारतीय स्त्री शक्ती यांच्या सामंजस्य करारातून
दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी स्त्री पुरुष समानता या विषयावर जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ माधुरी साकुळकर या प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुरेश भोसले हे अध्यक्षस्थानी होते.
जाणीव जागृती कार्यक्रमास सौ. साकुळकर यांनी आपल्या मनोगतात समानता व लिंगभेद यातील फरक
स्पष्ट करून, समानतेविषयी अनेक गोष्टींमध्ये असलेले शास्त्रीय पुरावे विद्यार्थ्यांसमोर मांडले. रुढी
परंपरामुळे चालत आलेल्या अनेक रितीभाती असमानता दर्शवत असतील तर आपण त्यावर विचार करावा
व काळानुसार बदल घडवून आणावेत यावर आपले मत मांडले. आधुनिकतेच्या युगात स्त्री पुरुष
समानतेच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टी नव्या पिढीने स्वीकारले आहेत. त्यांचे कौतुक ही केले पाहिजे
आणि युवकांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून सुसंस्कृत असा समाज निर्माण करण्यात प्रत्यक्ष सहभाग
घेतला पाहिजे. यावर अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले.
त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मार्गदर्शन करताना मैत्रीण
कुटुंब सल्ला केंद्राच्या पदाधिकारी सौ वसुंधरा कुलकर्णी व ॲड. राजेश्वरी केदार यांनी
अन्यायाविरुद्ध उभे राहून पिडीतांना या सल्ला केंद्राची मदत मिळू शकते यावर आपले मनोगत
व्यक्त केले. तर सदर केंद्राचे सांगोला शाखेत कामकाजाचे नेमके स्वरूप कसे आहे याविषयी
माहिती सौ अंजली पवार यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या
शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक क्षेत्रात एक आदर्श नागरिक होण्यासाठी अशा जाणीव जागृती
कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ही मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या वतीने करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी स्त्री पुरुष
समानतेमधील महत्त्वाचा अडसर म्हणजे आजपर्यंत स्त्रीयांनी घरकाम तर पुरुषांनी वरकाम करावे
असे म्हणले जात होते. आज बदलत्या काळानुसार हा विचार मागे पडत चालला आहे याविषयी
समाधान व्यक्त केले. आणि नव्या पिढीत समानता रुजलेली असेल असा आपणास विश्वास
वाटतो असे मत मांडले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या अभ्यासातील उपक्रमात
सहभागी होऊन आपला विकास साधावा असेही सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. चित्रा जांभळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सौ.
भाग्यश्री पाटील यांनी केले या कार्यक्रमास मुलींच्या वस्तीगृहाच्या रेक्टर सौ. सुरेखा सुरवसे, प्रा.
विशाल कुलकर्णी, सौ. राजेश्वरी लोखंडे, सौ. क्षमराज नष्टे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या
आयोजनाबाबत महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमासाठी
120 हून अधिक मुला-मुलींचा सहभाग होता. उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. सौ. भाग्यश्री पाटील
यांनी केले.