करगणी येथे एलकेपी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती .

महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली व सुमारे 15 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी अविरतपणे तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या करगणी तालुका आटपाडी येथील शाखेचा लोकार्पण सोहळा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
यावेळी आटपाडीचे युवक नेते अनिल पाटील, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, युवा उद्योजक विनायक मासाळ ,किरण पांढरे, दादासाहेब कचरे, उद्योजक सुखदेव कदम ,विश्वास सरगर, चेअरमन दत्तात्रय पाटील, उपसरपंच जब्बार मुल्ला ,पोलीस पाटील सत्यशील सवणे, नाथा सरगर ,उत्तम माने ,लक्ष्मण सरगर, भीमराव होनमाने, विजय सरगर ,समाधान ढोबळे ,दिनकर लांडगे , महादेव दिघे, संजय साळुंखे याचबरोबर विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
इथे नांदते लक्ष्मी… देते विश्वासाची हमी… हे ब्रीद घेऊन अनेक शाखांच्या माध्यमातून एल के पी मल्टीस्टेटचा अर्थविश्वातील वावर हा सर्वसामान्य व्यावसायिक , छोटे मोठे व्यापारी, उद्योजक व असंख्य ग्राहक यांना निश्चितच बळ देणारा असल्याच्या भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्योगांचे फार मोठे जाळे उभे करणारे या उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले हे या मल्टीस्टेटचे चेअरमन असून त्यांनी डॉ. बंडोपंत लवटे,जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांना सोबत घेऊन वित्तीय क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र ,दुधाचे क्षेत्र अशा अनेकविध क्षेत्रांच्या माध्यमातून शेकडो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले असून हजारो कुटुंबांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. आता पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा ,कोकण त्याचबरोबर शेजारील कर्नाटक राज्य असे मोठे ध्येय नजरेसमोर ठेवत एलकेपी मल्टीस्टेटच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रामध्ये मोठे पाऊल उचललेले आहे .
या संस्थेच्या माध्यमातून ठेविदारांसाठी अनेक प्रकारच्या आकर्षक योजना देखील ग्राहकांना देऊ केलेल्या आहेत. एलकेपी दाम दीडपट ठेव योजना , दाम दुप्पट, दाम तिप्पट तसेच दाम चौपट ठेव योजना त्याचबरोबर अवघ्या शंभर दिवसाच्या ठेवीवर देखील ही संस्था सुमारे दहा टक्के व्याजदर देते. 46 ते 90 दिवसांच्या ठेवी करिता सात टक्के व्याजदर असून मुदतीच्या टप्प्याटप्प्याने व्याजदर वाढत जाऊन जेष्ठ नागरिक, अपंग , विधवा ,संत महंत, माजी सैनिक ,महिला इत्यादींसाठी 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका विक्रमी व्याजदर ठेवीकरिता ही संस्था देत आहे. लहान मोठ्या व्यवसायिकांकरिता अत्यंत सुलभ व तात्काळ कर्ज या संस्थेकडून वितरित करण्यात येते. एटीएम, क्यू आर कोड ,आयएफएससी कोड तसेच भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची त्याचबरोबर चेक क्लिअरिंग ची सोय अशा अनेक प्रकारच्या सुविधा देखील या संस्थेकडून देण्यात येतात. आटपाडी तालुक्यातील करगणी ही एक प्रमुख बाजारपेठ असून गुरुवार या आठवडी बाजाराच्या दिवशी पंचक्रोशीतील अनेक गावातील नागरिकांची खूप मोठी रेलचल येथे होत असते. एलकेपी मल्टीस्टेट मुळे करगणी व आजूबाजूच्या आठ- दहा गावातील व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्यामुळे परिसरामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.