आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयाचे दैदिप्यमान यश.

नेपाळ (काठमांडू )येथे दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी आण्णासाहेब रड्डी याने ब्रांझ (कास्य )पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या अगोदर राजस्थान जैसलमेर येथे संपन्न झालेल्या नॅशनल युथ गेम्स 2022 मध्ये आण्णासाहेब रड्डी यांने गोल्ड मेडल पटकाविले होते .तसेच शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत कराटे या खेळ प्रकारात ही गोल्ड मेडल प्राप्त केले आहे .
या त्याच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर विद्यार्थ्याचे अभिनंदन सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सावे या संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री वसंत शेंडगे सर, सचिव मुरलीधर इमडे सर, खजिनदार श्री दिलीप सरगर सर, संचालक श्री दिलीप शेंडगे सर, विठ्ठल सरगर सर, श्री गंगाराम इमडे गुरुजी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व समस्त सावे ग्रामस्थ यांनी केले.