डॉ.बाबासाहेब देशमुख वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण

सांगोला तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते तथा महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 29 डिसेंबर 2022 रोजी सांगोला शहर मर्यादित शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जिमखाना विभाग विज्ञान महाविद्यालय सांगोला यांच्या वतीने करण्यात आले होते
या स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी इयत्ता 8 वी ते 10 वी व जुनिअर कॉलेज असे मुला मुलींचे तीन गट तयार करण्यात आले होते सांगोला तालुक्यातील विविध शाळे मधील मुला मुलींनी बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन आपले बुद्धिबळचे कौशल्य गुण दाखवून दिले
या बुद्धिबळ स्पर्धेमधील पहिला, दुसरा, तिसरा, व चतुर्थ क्रमांक खेळाडूंना पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते दीपक गोडसे यांच्या तर्फे ट्रॉफी देण्यात आलेली आहे
या बक्षिस वितरण प्रसंगी युवा नेते दीपक गोडसे, युवा नेते रमेश जाधव, अक्षय बोत्रे, सूर्यगन, तसेच ज्ञानदीप विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मुजावर सर, प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. अशोकराव शिंदे प्रा. संतोष लवटे व अनेक खेळाडूंचे पालक उपस्थित होते. प्रास्ताविक स्पर्धा घेण्यासाठी मागच्या उद्देश विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांनी स्पष्ट केले तर शेवटी आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले सर यांनी केले
सर्व यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये शुभम दत्तात्रेय मसगवंडे व केतन भारत कटरे ( एल एस वी डी विद्यालय जवळा ) प्रसन्न सुनील सूर्यगण, शाहीद जमीर मुजावर, समर्थ संजय कवठेकर , स्वर श्री सचिन देशपांडे, ऋतुजा मेटकरी, अक्षरा शशिकांत सुटकर, ओवेस जमीर मुजावर, होतेच महेश कुमार बुरंजे सर्व ( उत्कर्ष विद्यालय सांगोला ) मुजावर तरंनुम महंमद गौस , श्रीराम संजीवनी तानाजी, विपुल अतुल इंगोले सर्व ( ज्ञानदीप विद्यालय सांगोला ) अर्जुन बापूसो सावंत ( विद्या मंदिर प्रशाला सांगोला ) व विश्वजीत विकास गायकवाड ( न्यू इंग्लिश स्कूल सांगोला ) या सर्व खेळाडूंना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.