तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत हलदहिवडी येथील पाटील – बागल वस्ती प्रथम क्रमांक

सांंगोला : दिनांक 12 जानेवारी रोजी झालेल्या तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी स्पर्धेमध्ये हलदहिवडी (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील-बागल वस्ती या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. अगदी वाडीवरील शाळा असून मुलांनी घेतलेले कष्ट आणि शिक्षकांचेही प्रयत्न या यशासाठी कारणीभूत ठरले. सुरुवातीपासून मुलांनी आपली कला दाखवत सूर ताल लय यामध्ये कुठेही कमीपणा न दाखवता परीक्षकाचे मन जिंकून घेतले. याच शाळेने 2019 साली झालेल्या स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी निवड झाली होती. जिल्हास्तरावर सुद्धा द्वितीय क्रमांक मिळवला होता. यासाठी ढोलकी वादक सिद्धू पारडे, खंजिरी वादक रणवीर गायकवाड, हार्मोनियम वादक श्री ढेकळे सर आणि श्री सुरवसे सर या सर्वांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले. प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने मुलांचे, शिक्षकांचे कौतुक केले.